ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या हालचाली !भाग -9

0

अहवालावर हवी ठोस कारवाई : वरिष्ठ पातळीवरुन दखल नाहीच

जळगाव, दि. 17 –
जिल्हा परिषद अंगणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या हालचाली सुरु असून चोर सोडून सन्याश्याला फाशी देण्याचा प्रकार होत आहे. प्राप्त अहवालावरुन ठोस कारवाई करण्याची मागणी होत असता देखील त्याकडे दुर्लक्ष होत असून या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन गंभीर दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.

अधिकार्‍यांची खटाटोप कशासाठी?
या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी न दाखविणारे अधिकारी कुणाच्या सांगण्यावरुन हे करीत आहेत असा प्रश्‍न उपस्थित राहत आहेत. ठेकेदाराला वाचविण्यासाठीचा अधिकार्‍यांचा हा खटाटोप कशासाठी?

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी जिल्ह्यातील 15 अंगणवाड्यांच्या रँडम चौकशीचे अहवाल प्राप्त झाले असूनही ठोस कारवाईचे अद्यापही संकेत मिळत नसल्याने या प्रकरणी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. हा ठेका धुळे येथील भाजपा पदाधिकार्‍याकडे असून स्थानिक पदाधिकारी व अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. बालल व महिलांना सकस आहार पुरविण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने देखील या प्रकरणी गंभीर दखल घेतली नसल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.