विचारमंथनानंतर ठरणार कारवाईचा फार्स! भाग -8

0

कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न : जि.प वर्तुळात उत्सुकता

जळगाव, दि. 16 –
बुरशीयुक्त शेवया प्रकरणानंतर रँडम पद्धतीने करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर थेट कारवाई करण्याचे वा तो अहवाल विभागीय स्तरावर पाठविण्याअगोदर त्याचे विचारमंथन करण्यावर भर दिला जात आहे. एकीकडे ठेकेदारावरील कारवाई टाळ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु असून या सार्‍या प्रकरणाची जि.प आता उत्सुकता वाढली आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत आढललेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणाने जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली असून ठोस कारवाई करुन प्रतिमा सुधारण्याचे सोडून काही अधिकारी व लोकप्रतिनिधी चौकशी अहवालावर विचारमंथन करुन ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात आहेत. अगोदरच रँडम चौकशीच्या अहवालाला उशिर झालेला असता देखील प्राप्त अहवालाबद्दल गांभीर्याने चर्चा होतांना दिसत नाही. अपेक्षेप्रमाणे गेल्या आठवड्यात चौकशी अहवाल प्राप्त होणे क्रमप्राप्त होते मात्र त्याला उशीर झाला असून या प्रकरणी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण झाली आहे. आता 15 अंगणवाड्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांच्यावरील टिपणी करुन तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यास चालढकल सुरु आहे. धुळे येथील ठेकेदाराने बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले असताना देखील त्याला वाचविण्यासाठी धडपड सुरु असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.