ट्रेन लाईव्ह संघटनेच्या दिलीप पाटील यांनी मिळवुन दिली महिलेची पर्स

0

पाचोरा प्रतिनिधी

दि. 11 रोजी डाऊन साईडवरील 11038 महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एका अज्ञात इसमाने रिझर्व्हेशन बोगीत चोरी केली हा प्रकार चाळीसगांव ते पाचोरा दरम्यान घडला. अज्ञात इसमाने चोरी करत महिलेची पर्स पळविली पळत असतांना चोरास समजले आपला कुणी पाठलाग करतंय हे त्याने समजून तो टॉयलेट मध्ये लपून बसला. महिलेने आरडाओरड करत असतांना रोजचे प्रवासी व ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे सदस्य, शिवश्री ग्रुपचे सदस्य हे पुढे सरसावले. महिलेला धीर देत आम्ही चोर शोधतो असे सांगत त्यांनी शोध घेणे सुरू केले त्यात 2 ते 3 टॉयलेट चेक केले असता त्यात तो इसम आढळला त्याच्या कडे सदरची पर्स जी चोरी करून पळत होता ती त्याकडे आढळली. प्रवासी व च्या चाणाक्ष तेणे टॉयलेट मध्ये शोध घेऊन पकडण्यात यश आले.
लगलीच ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांना भ्रमणध्वनी वर याबाबत कळविले दिलीप पाटील यांनी तात्काळ पाचोरा स्टेशन गाठत तेथील रेल्वेचे पोलिस निरीक्षक एस. बी. पाटील कळविले. त्यांनी टीम तयार करत जी.आर.पी.एफ. विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे भावसार, आर.पी.एफ. शर्मा यांना रेल्वे बोगी एस – 2 जवळ जाऊन आरोपीस त्याब्यात घेण्यासंबंधी सूचना केल्यात त्याबरोबर सदर ऑफीसर स्टाफ व दिलीप पाटील हे एस – 2 बोगी जवळ जाऊन रेल्वे पाचोरा स्टेशन थांबताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. रेल्वे ने रोज ये – जा करणार्‍यांनी मोबाईल वरून रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांना कळविताच तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले, तितक्यात ट्रेन सुरू झाल्याने फिर्यादिस दिलीप पाटील यांनी भुसावळ येथे पुढील आर.पी.एफ. स्टाफ पाठवितो ट्रेन 10 मिनिटे थांबते तो स्टाफ आपणा जवळ एस – 2 मध्ये येऊन फिर्याद घेईल आपण ती फिर्याद देऊन आर.पी.एफ. विभागाला पूर्णतः सहकार्य करून आरोपीस जेरबंद करण्यास मदत होईल याबाबत सल्ला दिला. पुढील कार्यवाही सुरू आहे या सर्वच पोलिस स्टाफ चे आभार मानण्यात आलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.