जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय मॅनेजमेंट स्पर्धेचे आयोजन

0

जळगाव प्रतिनिधी

जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय नेहमी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने प्रथमच ऑल इंडिया मॅनेजमेट असोसिएशन व चाणक्य आयोजित 23 व्या स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेची प्राथमिक फेरी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात होणार आहे. व्यवस्थापन विध्यार्थ्याच्या बोद्धिक विकासाला चालना देण्यासाठी मागील 22 वर्षापासून आयमा व चाणक्य यांच्या सयुंक्त विध्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बॅगलोर, पुणे, नवसारी या प्रगत शहरामध्ये मागील 22 वर्षापासून स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात यायचे परंतु यावेळी प्रथमच जळगाव शहरातील सुपरिचित जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्याने महाविध्यालयाच्या लौकिकात पुन्हा भर पडली आहे. 22,23,24 ऑक्टोबरला सदर महाविध्यालयात या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीन ते चार विध्यार्थ्याना सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी खानदेशातील स्थानिक विध्यार्थ्यांना प्रथमच मिळणार आहे. तसेच या स्पर्धेत चाणक्य या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना वास्तविक जगातील बिजनेसच्या परिस्थिती दिल्या जातील. त्या परिस्थितीमध्ये स्पर्धकांना बिजनेस रिलेटेड निर्णय घ्यावे लागतील उदा. उद्योगात कच्चा मालाचा कमी वापर, जाहिरातींवर कमी अधिक खर्च, नवीन टेक्नोलॉजीचा वापर, ग्राहकांच्या अपेक्षा व आदी निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसवर कसा होतो हे त्यांना ङ्गचाणक्यफ या सॉफ्टवेअरद्वारा कळेल तसेच त्यांनी स्पर्धेमध्ये घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या बिजनेसच्या मार्केटीग विभाग, फायनान्स विभाग, एच. आर. ऑपरेशनवर देखील कसा होतो हे त्यांच्या लक्षात येणार आहे .
या स्पर्धेतून विध्यार्थ्यांना उद्योजकता निर्माण करणे, नेतृत्व कौशल्य तसेच निर्णय क्षमता वाढवणे आदी बाबी लक्षात येतात त्यामुळे बिजनेस मॅनेजमेटच्या विध्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी मोठे आकर्षण असते. पहिल्यांदाच जळगाव शहरात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे रायसोनी इंस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.