टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या’ यादीत पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी आणि अदार पूनावाला

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टाइम साप्ताहिकाच्या  प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या 100 जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी , पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी , सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला  यांचा समावेश आहे. टाइमने बुधवारी ‘2021 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची’  वार्षिक यादी जाहीर केली.

पीएम मोदींच्या टाइम प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की, स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या 74 वर्षांमध्ये तीन प्रमुख नेते होते. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे तिसरे नेते आहेत, त्यांच्यानंतर कोणीही नाही.

‘टाइम’ने ममता बॅनर्जीच्या प्रोफाईलमध्ये लिहिले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उजळले आहे.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविषयी म्हटले आहे की, 40 वर्षीय पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत असून त्यांनी अत्यंत योग्यवेळी जगाला मदत केली. कोरोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पूनावाला नक्की मदत करतील. लस असमानता गंभीर असून जगातील काही देशांकडे जास्त लस आहे तर काही देशात लशीचा तुटवडा आहे.

दरम्यान टाइम साप्ताहिकाच्या या यादीत अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्युक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन तसंच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

याशिवाय एलोन मस्कचे नावही ‘इनोव्हेटर्स’मध्ये समाविष्ट आहे. पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात अटक झालेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांचा प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.