जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय ; आज पुन्हा ८०१ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे.  जिल्ह्यात आज पुन्हा ८०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज तब्बल ८०१  नवे रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक १९३ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ९३३ वर पोहचला आहे.

असे आढळले रुग्ण 

जळगाव शहर १९३, जळगाव ग्रामीण-38; भुसावळ-69, पाचोरा-08,अमळनेर ५१, भडगाव- 06, चोपडा ८२,  धरणगाव-21; यावल-20; एरंडोल-128; जामनेर 62; रावेर-20; पारोळा-17; चाळीसगाव-54; मुक्ताईनगर 2; बोदवड-22 व बाहेरच्या जिल्ह्यातील 8 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज ५६२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्‍या रूग्णांचा आकडा २० हजार  ८३० वर गेला आहे. तर आज दिवसभरात ०९ जणांचा मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या ८३१ इतकी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.