जागी गाळे उभारणार्‍यांची चौकशी करा

0

जळगाव दि. 7-
महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केटमध्ये शौचालयाच्या जागी मनमानी करुन गाळे उभारून त्याचे भाडे लाटणार्‍यांची चौकशी करुन कारवाई करा, आदेश उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांना पत्राद्वारे गुरुवारी दिले.
महानगरपालिकेच्या फुले मार्केट येथे शौचालयाच्या जागेवर मनमानी करुन परस्पर गाळे उभारून त्याचे भाडे व डिपॉझिट लाटले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सर्व प्रकारची चौकशी करावी, सदर गाळे खाली करुन नागरिकांसाठी शौचालये उभारा असे लेखी उपमहापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
1999 पासून भाडे लाटण्याचा प्रकार
सदर मार्केटबाबतचा चूकीचा ठराव शासनाकडून विखंडीत करण्यात आलेला आहे. शौचालयाच्या जागेवर गाळे उभारुन डिपॉझिट व भाडे लाटण्याचा प्रकार 1999 पासून सुरु असून त्याची चौकशी करुन तेव्हापासूनचे भाडे, डिपॉझिट, त्यावरील व्याजाचीही वसुली करावी, अशा सूचना डॉ. सोनवणे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.