मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा

0

पिडीतेच्या मातेची मागणी, पोलीस ठाणे व शवविच्छेदन अहवालात विसंगती

जळगांव .दि.8 –
वरणगांव येथील रहिवासी सविता इंगळे या विधवा असून दोन मुलींचा सांभाळ मोठया कष्टाने केले.यातील प्रियंकाचा विवाह मे 2018 मधे करंजी येथील गोपाळ पाटील याचेशी करून दिल्यानंतर काही महिन्यानंतर गोपाळ पाटील याने व्हिडीओ कॅमेरा घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्यानुसार इंगळे यांनी 20 हजार रूपये दिले होते. तरीदेखिल आणखी पैसे हवेत म्हणून 29 नोव्हेंबर रोजी गोपाळ पाटील याने मुलीस मारहाण केली यात तिचा मृत्यु झाला यात मुलीच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या विरूद्ध केवळ 306 कलम लावले असून केवळ दोन जणांना अटक केली आहे. यात 498 व 302 कलमे लावण्यात येवून अधिकार्‍यांकडे हा गुन्हा वर्ग करण्याची मागणी सविता इंगळे यांनी जिल्हा पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परीषदेत केली आहे
वरणगांव येथील सविता इंगळे यांच्या मुलीचा मृत्यु 29 नोव्हे 2018 रोजी झाल्यानंतर या घटनेत पोलीस ठाणे कर्मचार्‍यांनी पक्षपातीपणा केला असून मुलीला नेहमीच पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. हे सांगून देखिल कलम लावले नाही. शिवाय शवविच्छेदन अहवाल व पोलीस ठाण्याचा अहवाल यात देखिल मोठया प्रमाणावर विसंगती दिसून येत आहे. या घटनेतील दोन जणांना अटक केली असली तरी मुलीच्या सासूला अटक केलेली नाही हे संशयास्पद असून मुलीच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या विरूद्ध योगय कलमे लावू गुन्ह्याचा तपास योग्य अधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात यावा वरणगांव पोलीसांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी दिलेल्या प्रसिदधी पत्रकात म्हटले आहे. केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.