जळगावात महिलेची सोनसाखळी लांबवून चोरट्यांची ‘धूम’ !

0

जळगाव : – शहरातील हरेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची पायी चालत असताना १ लाख २० हजारांची सोनसाखळी मोटासार सायकलने येत धूम स्टाईलने लांबविल्याची घटना उघडकीस आली असून पुन्हा महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविण्याचा प्रकार घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , ललना चंद्रमोहन टेमकर (58, वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर, जळगाव) या शनिवार, 1 जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजता अपार्टमेंटसमोर उभ्या असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी टेमकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.