जळगावच्या आशादिपमधील अत्याचारावरून सुधीर मुनंगटीवार संतापले; म्हणाले…

0

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घडलेल्या अत्याचाराचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल.

 

मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.

 

दोन दिवसात चौकशी

दरम्यान, जळगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसात या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.