कोरपावली येथे सरपंच व उपसरपंच यांनी बंद असलेली कुपनलीका स्वह खर्चाने केली सुरू

0

यावल ( प्रतिनिधी): तालुक्यातील कोरपावली येथील उपसरपंचांनी पदरमोड करून गावातील नागरीकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुपनलिका सुरू केली. आगामी उन्हाळ्यात गावात टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. कोरपावली येथील उपसरपंच.हमिदाबी पिरन पटेल व त्यांचे चिरंजिव  मुख्तार पिरण पटेल यानी : स्वः खर्चाने आगामी काळातील उन्हाळा लक्षात घेता, गावात टंचाई भासू नये म्हणून कुपनलिका सुरू केली. गावात असलेल्या जुन्या कुपनलिकेतील पंप हा नादुरूस्त होता, त्यामुळे त्यांनी पदरमोड करत नवीन सबमर्सिबल पंपसेट, केबल, पीव्हीसी पाईप, तसेच आवश्यक सर्व इलेक्ट्रीकल साहित्य आणून कूपनलिका सुरू केली. या कुपनलिकेचा परिसरदेखील स्वच्छ करण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे गावातील गटारी,: सांडपाण्याचा प्रश्न सोडवून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या कूपनलिकेचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून, सरपंच विलास अडकमोल यांच्याहस्ते कुपनलिका सुरू करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविण सपकाळे.व सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, हफशान तडवी, हुरमत तडवी, माजी सरपंच जलील पटेल, संदीप नेहेते, सादिक पटेल, उमेश जावळे, इमरान पटेल, इसाक पटेल, जावेद पटेल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.