जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये शनिवार सायंकाळच्या दरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त तुकडीवर झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले आहेत. शुक्रवार रात्रीपासून जम्मू काश्मीर खोऱ्यातील हा दुसरा हल्ला आहे. शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नीवा परिसरात सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात एक जवान जखमी झाला होता. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी नेवा येथील सीआरपीएफच्या १८३ बटालियनच्या जवानांवर बेछुड गोळीबार केला होता.

आठवड्याभरापूर्वी जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात विशेष पोलिस अधिकाऱ्याची हत्या करुन त्यांच्या सहकाऱ्याला गंभीर जखमी करण्यात आले होता. या प्रकरणातील दोन दहशतवाद्यांचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला होता.  जम्मू पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची पुष्टी देखील केली होती.  सध्याच्या घडीला जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत पाककडून काही दहशतवादी संघटना भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असल्याची माहितीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.