चोसाकाचे थकीत पेमेंट देण्यासाठी लक्ष घालणार-अजित पवारांचे चोपड्यात प्रतिपादन

0

चोपडा, दि.19-
चोपडा साखर कारखाण्याचे गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकर्‍याचे दोन कोटी 44 लाख रुपये पेमेंट थकीत असून तालुक्यात ऊस उभा आहे,या बाबत मला शेतकरी देखील भेटले,ते थकीत पेमेंट देण्यासंदर्भात आपण दोन दिवसांनी साखर आयुक्तशी चर्चा करून पैसे काढून देऊन उभा असलेला ऊस देखील नजीकच्या कारख्यांन्याना देण्याबाबत व्यवस्था करणार असल्याचे ग्वाही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोपड्यात बोलताना दिली.
चोपड्यात आज बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रा निमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर माजी गृहमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,माजी मंत्री फौजिया खान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,माजी मंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील,माजी आमदार दिलीप सोनवणे,अरुण पाटील,सामाजिक न्याय विभागाचे आमदार जयदेव गायकवाड,महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील,नगरध्यक्षा मनीषा चौधरी,प्रभाबेन गुजराथी, तिलोत्ममा पाटील,प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील,चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल,जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील,आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी च्या परिवर्तन यात्रेत बोलताना सांगितले की,या सरकारला शेतकर्‍यांची आस्था उरली नाही,शरद पवार यांनी कांदा, कापूस,मका उत्पादक शेतकर्‍यांना न्याय दिला होता,या सरकारने गाजर दाखवले,तुमची माझी सर्वाची फसवणूक केली आहे.महागाईचा डोंगर उभा केला असून गैस आमच्या काळात साडे तीनशे होता तो आता नऊशे झाला आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार जनावरांच्या छावण्या सुरू करत नाही,दुधाला भाव नाही,याच्या कडे टँकर सुरू करायला पैसे नाही,लोकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पैसे नाही,राज्यावर पाच लाख कोटींची कर्जाचा डोंगर उभा केला आहे ते कर्ज कोण फेडणार असा सवाल देखील अजित पवार यांनी केला.हजारो कोटींचा भष्ट्राचार करून देशातून दिवसा
निरव मोदी,विजय मल्ल्या पळून गेले,पैसे आपले गेले,गरीब गरीब होत चालला आहे आणि अदानी, आणि अंबानी मात्र श्रीमंत होत चालले आहेत.आज दुष्काळी परिस्थिती दूर होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सरकार सुरू करत नाही.
**खोटं बोला पण रेटून बोला हा कार्यक्रम सरकारचा सूरु आहे.पुन्हा निवडणुकीत सेने-भाजप वाले विष पेरण्याचे काम करतील.पन्नास टक्के आरक्षणाला धक्का यांनी लावला आहे.माधुरी पाटील याना तालुक्यातील जनतेने पराभूत केले,महिलांना संधी देण्याचे शरद पवार यांनी केले असून येत्या
लोकसभेत व विधानसभा मध्ये योग्य उमेदवार देऊ असेही अजित पवार यांनी सांगितले.
**गिरीश महाजन याची जलसंपदा खात्याची कामे ठप्प झाले आहेत.शिल्लक कामे आपण पूर्ण करू,मार्केट कमिटी मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार करत आहे.भाजप सेनेला जागा दाखवा असेही अजित पवार यांनी सांगितले.तसेच चोपडा पालिकेच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत.लोकसभा व विधानसभेची पूर्णावृत्ती करू नका आणि राष्ट्रवादी ला विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी सभेत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.