भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल यांचा वाढदिवस साजरा

0

शेंदुर्णी दि. 19-
भाजपाची जिल्हा उपाध्यक्ष व मुलुख मैदानी तोफ गोविंद भाई अग्रवाल यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सकाळी दत्त मंदिरात महापुजा व अभिषेक करण्यात आली.नगरपंचायतीच्या कार्यालयात नगराध्यक्षा सौ.विजया खलसे व अमृत खलसे, उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल, गटनेत्या सौ.रंजना धुमाळ, सर्व नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप,गरिबांना ब्लँकेट वाटप,वाडी वस्तीत रुग्णसेवा आदी कार्यक्रम झाले.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे ,राज्याचे जलसंपदा व वैद्यकीयशिक्षण मंत्री ना.गिरीश भाऊ महाजन ,जिल्हाध्यक्ष उदय वाघ,खा रक्षाताई खडसे,खा.ए.टी.नाना पाटील व विविध नेत्यांनी,जिल्ह्यातील नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी शुभेच्छा दिल्यात.
सायंकाळी गोपाला जिनप्रेस मध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
जनतेचे प्रेम व ना.गिरिशभाऊंच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णीच्या विकासासाठी आपण न नगरपंचायत कटीबद्ध असुन गावाच्या विकासासाठी सर्वानिच पक्षभेद विसरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा भजन आँरकेस्टा यांच्या साथीने साजरा करतात आला यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांनी गोविंद शेठ अग्रवाल यांची लाडुतुला केली

Leave A Reply

Your email address will not be published.