चोपडा येथील बी. फार्मसी महाविद्यालयात वर्ष ग्रंथ 2021 चे प्रकाशन संपन्न

0

चोपडा (प्रतिनिधि)

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एन. बी. ए मानांकन प्राप्त रौप्यमहोत्सवी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथील “वर्षग्रंथ- 2021” या वार्षिक मासिकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले.

Covid-19 सारख्या महामारीच्या काळात यंदा ही वर्ष ग्रंथाची संकल्पना नाविन्यपूर्ण अशा रीतीने संपादकीय चमूने जोपासली यांचे मनस्वी कौतुक मा. जिल्हाधिकारी यांनी प्रकाशन वेळी केले. साध्या एका क्यू आर कोड स्कॅनिंगच्या मदतीने हे वार्षिक नियतकालिक विद्यार्थी पालक व इतर सर्व डाऊनलोड करून वाचन करू शकतात असे प्रतिपादन प्रकाशन वेळी उपस्थित महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.

“वर्षग्रंथ – 2021” तयार करण्याकरिता महाविद्यालयातील संपादकीय सदस्यांनी घेतलेले परिश्रम तसेच विद्यार्थ्यांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच प्रकाशन प्रसंगी सत्कारणी लागला असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी व्यक्त केले.  ई लर्निंग डिजिटल फार्मसिस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सदुपयोग समाजप्रबोधनाच्या सारख्या कामात होऊ शकतो ही बाब देखील ही वार्षिक वर्षग्रंथ – 2021 च्या निमित्ताने सिद्ध होते असे आपणास दिसून येते.

सदर ही वर्ष ग्रंथासोबतच महाविद्यालयाचे मासिक न्यूज लेटरचे देखील प्रकाशन मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षग्रंथ प्रकाशनाची परंपरा निरंतरपणे जोपासल्या बद्दल महात्मा गाँधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिताताई पाटील, उपाध्यक्ष सौ आशाताई पाटील, समन्वयक  दिलीप साळुंखे यांनी संपादकीय सदस्यांचे व विद्यार्थ्यांचे हृदय अभिनंदन केले.

छोटेखानी सदर विमोचन समारंभप्रसंगी महात्मा गाँधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट संदीप सुरेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी पी वडनेरे, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री पी. बी. मोरे, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. जे. सी. हुंडीवाले,  विभाग प्रमुख डॉ. ए व्ही पाटील, डॉ. भरत जैन, डॉ. किरण पाटील,  डॉ. एमडी रागिब, प्रमुख संपादकीय सदस्य  स्वर्णलता गाजरे,  क्रांती पाटील,  प्रेरणा महाजन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.