चितोडे वाणी समाजातर्फे ऑनलाईन भुलाबाई- भुलोजी दर्शन सोहळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चितोडे वाणी समाजातर्फे ऑनलाईन भुलाबाई- भुलोजी दर्शन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. सण समारंभ उत्सव म्हटले की एक आनंद, जल्लोष वेगळाच असतो. हे सण आपणास एक नवी उमेद देतात. असे सण जर योग्य पद्धतीने साजरे झाले तर ते पुढील पिढीपर्यंत टिकून राहतील.ल, यासाठी ऑनलाइन पद्धतीने भुलाबाई- भुलोजी दर्शन सोहळा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

चितोडे वाणी समाजाचा भुलाबाई -भुलोजी ऑनलाईन दर्शन सोहळा रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना तसेच कु. प्रतीक्षा वाणी हिच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सौ. शांताताई वाणी जळगाव व सौ. सुधा नंदर्षि, डोंबिवली यांच्या हस्ते झाले.

समाजातील भगिनींनी गाणे म्हणत टिपरी खेळत आपल्या घरातील भुलाबाई भुलोजीचे ऑनलाईन दर्शन सर्वांना घडविले. कार्यक्रमासाठी विविध राज्यांतील तसेच परदेशातील १०० पेक्षा जास्त समाज बंधूभगिनींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमात ४५ घरातील भुलाबाई भुलोजी दर्शनाचा लाभ सर्वांना झाला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. सुनिता वाणी नशिराबाद व सौ. सुवर्णा वाणी यावल यांनी केला. सौ. शांताताई वाणी जळगाव, सौ. सुधाताई नंदर्षि डोंबिवली, सौ. अंजलीताई यावलकर पुणे तसेच सौ. चंचल श्रावगी वरणगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

भुलाबाई भुलोजीचे महत्त्व व समाजासाठी असणारे संस्कार किती उपयुक्त आहेत याविषयी मार्गदर्शन केले . ही संस्कृती पुढील पिढीने जपावी याविषयी आवाहन केले .समाजातील भगिनींनी हा कार्यक्रम पुढील वर्षी सुद्धा घ्यावा असे सुचविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुधा वाणी पुणे, सौ. ज्योती वाणी पुणे, सौ. मनिषा गजऋषी पुणे तसेच सौ. भाग्यश्री वाणी जळगाव यांनी केले. शेवटी सौ. छाया गडे जळगाव यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.