मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम मध्ये सौ. बियाणी प्रथम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क –

मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी सौ. अंजली प्रतिक बियाणी यांनी एम. ए. इन मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम च्या चारही सेमिस्टर मध्ये प्रथम मानांकन प्राप्त करत फायनल मध्ये 9.95 सिजीपीए सोबत 87.65 % मार्क्स मिळवून मु जे महाविद्यालयातून प्रथम आल्या. हिंदी भाषिक बियाणी यांनी संपूर्ण ज्ञान इंग्रजी मधेघेऊन प्रथम मानांकन प्राप्त केल्याने परिवाराचा नावलौकिक वाढविला आहे.

या अगोदर सौ अंजली यांनी इंदोर महाविद्यालातून बॅचलर इन जर्नालिझम आणि एम.ए इन फिलाॅसाॅफी मध्ये यश संपादन केले असून त्यात हि प्रथम मानांकन मिळविले आहे. यापुढे हि त्यांच्या आवडीनुसार करियर करण्याचा त्यांचा मानस आहे. सौ. अंजली हि जळगावचे व्यापारी श्री. लक्ष्मीनारायण बियाणी यांची नातसून असून श्री. विनोद व सौ. हेमा बियाणी यांची सून आहे.

अंजली बियाणी त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांचा परिवार, मित्र, शिक्षक वर्ग यांना दिले आहे. शिकण्याची कोणती हि मर्यादा नाही. माणूस शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या क्षेत्रात शिकत राहायला हवे. माझ्या परिवाराने मला सतत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी आज हे यश संपादन करू शकले असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.