पंतप्रधान मोदी सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार – कमालीची उत्सुकता

0

मोदी नेमकं काय सांगणार याबाबत उत्सुकता शिगेला; सर्वसामान्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण

नवी दिल्ली – लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २२ ऑक्टोबर रोजी (शुक्रवार) सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी आज नेमकं काय सांगणार, याबाबत देशवासियांना उत्सुकता लागली आहे.पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून संबोधन करणार असल्याचे समजल्यावर नागरिकांना त्याबाबत कमालीची उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर आजच्या संबोधनाबाबत देखील विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

यामध्ये देशातील करोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, देशभरातील लसीकरण मोहीम, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.

याशिवाय, केंद्र सरकारकडून  काही विशेष क्षेत्रांसाठी पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं का? असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, आता देशातील अनेक मोठी शहरं अनलॉक होत असल्याने, या पार्श्वभूमीवर जनतेला दक्षता बाळगण्या संदर्भातही मोदी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.