चाळीसगाव न.पा.विषय समितीच्या सदस्यांची निवड सत्ताधारी गटनेता राजेन्द्र चौधरी ऐवजी संजय पाटील

0

चाळीसगाव दि.4
येथील नगरपालिका चे विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक पिठासन अधिकारी तथा तहसीलदार श्री कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा सौ आशालताताई चव्हाण उपनगराध्यक्षा सौ आशाताई चव्हाण तसेच मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.
यावेळी लोकनेते अनिल देशमुख आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी विषय समित्यांच्या सदस्य हे आठ किंवा दहा असावेत असा मुद्दा मांडल्यानंतर सभागृहात तू तू मैं मैं सुरू झाली.शेवटी पिठासन अधिकारी श्री कैलास देवरे यांनी अकरा सदस्य संख्या निश्चित केल्या चे जाहीर केले,या मध्ये आघाडी चे पाच भा ज पा चे पाच तर सेनेचा एक घेत सभा शांतपणे पार पडली.
राजेन्द्र चौधरी गटनेते पदावरून पायउतार,तर संजय पाटील यांची निवड जाहीर.
नगरपालिकेत गेली पस्तीस वर्षांपासून सतत निवडून येणारे अनुभवी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना भा ज पा ने गटनेते पदावरून पायउतार केले.त्यांच्या जागी नगरसेवक संजय पाटील यांची निवड जाहीर केली.या निर्णयाने शहरात चर्चेला उधाण आले आहे.आमदारांच्या या खेळीने भविष्यात कोणाचा फायदा होतो आणि कोणाचं नुकसान होते तो येणारा काळच ठरवेल.परंतु आज तरी राजेन्द्र चौधरी सभागृहात शांत बसून होते.

Leave A Reply

Your email address will not be published.