वीर मराठा मावळा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत पाटील

0

 

पाचोरा दि.4
वीर मराठा मावळा संघटना, महाराष्ट्र राज्य जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी पाचोर्‍यातील प्रशांत रामदास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मराठा समाजासाठी त्यांची तळमळ आणि जिद्द व त्यांनी केलेले मराठा समाजासाठी कार्याची दखल घेऊन व जळगांव जिल्ह्या मध्ये मराठा समाजाला चांगले नेतृत्व मिळावे यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड पुणे येथे वीर मराठा मावळा संघटना, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी शामराव पाटील (नागरे), प्रदेश अध्यक्ष शेखर विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमात पुणे जिल्हा प्रमुख प्रशांत भोसले आणि महिला जिल्हा प्रमुख छाया भगत उपस्थित होते.
आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना प्रशांत पाटील म्हणाले की, मराठा समाजासाठी माझे वडिल रामदास(संजूबाबा) पाटील. यांचे पाचोरा तालुका साठी मोठे योगदान दिले आहे. मला त्यांच्या कडूनच प्रेरणा मिळाली आहे. मराठा समाजासाठी व मराठा समाजाच्या तरुणान साठी मी शेवट पर्यंत लढत राहणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.