नेरीच्या जनता विद्यालयात शिक्षक दिन साजरा

0

 

जामनेर दि.4
तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात दि. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय कामकाजाची उत्कृष्ट भुमिका पार पाडली विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणुन दानिश पिंजारी तर पर्यवेक्षक म्हणुन मकरंद पाटील यांनी जबाबदारी सांभाळली तसेच या शिक्षक भुमिकेत 32 मुली व 7 मुलांनी सहभाग घेतला होता यामध्ये उत्कृष्ट अध्यापन करणार्‍या 3 विद्यार्थ्यांची निवड जेष्ठ शिक्षक एस.डी.सुरळकर यांच्या समितीच्या माध्यमातून करण्यात आली त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला यामध्ये प्रथम डिंपल नारखेडे 9 ड
द्वितीय – ललिता बर्हाटे -9 डतृतीय – राजकन्या परदेशी 9 ड यांची प्रथम गट यांच्यातून निवड करण्यात आली तसेच द्वितीय गटातून साक्षी विवतकर 9 क द्वितीय – भावना पाटील 9 ब तृतीय – संजीवनी वराडे 9 डयांची निवड करण्यात आली.त्यानंतर आजच्या शिक्षक भुमिकेत असणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला व सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनावर प्रकाश पाडला या कार्यक्रमाचे आयोजन आर.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस.धनगर,बी.एन.जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शालेय अध्यापन करतांना कोणकोणत्या अडचणी येतात ते समारोप प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांनी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले व आजच्या कार्यक्रमीय अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती.सांगितली तसेच दि. 3 जानेवारी हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे निवेदन आजच्या कार्यक्रमातील मुख्याध्यापक दानिश पिंजारी याने यावेळी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.ए.पाटील,पर्यवेक्षक एस.एन.पाटील,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, सर्व जेष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.