चाळीसगाव तालुक्यात सरकारी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव

0

चाळीसगाव | प्रतिनिधी 

चाळीसगाव शहरातील जवळपास लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहराला एकच सरकारी ग्रामीण रूग्णालय आहे परंतु रूग्णालयात कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवेचा सुविधांचा अभाव या रूग्णालयात पहावयास मोळतो सध्यस्थितीत देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने चाळीसगाव शहरात ग्रामीण रुग्णालयात या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पाहिजे तशी कोणतीही उपाययोजना नसल्याने जळगाव जिल्हा जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख प्रा.गौतम निकम सर यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदनाद्वारे तक्रार केली की, चाळीसगाव तालुक्यात सरकारी ग्रामीण रुग्णालयात एक ही व्हेंटिलेटर नाही,सरकारी डॉक्टर, नर्स, फार्मसीस्ट, कंपाउंडर, लॅब टेक्निशियन, ईसीजी, एक्सरे, इ ची कमतरता आहे त्यातल्या त्यात नागरिकांना आडदांड पणा, बेफिकीर पणा,इ आहे   जर 350000 लोकसंख्या असलेल्या तालुक्यात जर कोरोना ने थैमान घातले तर काय भीषण परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना जरी केली तर मन बेचैन होते जिल्ह्यात एक ही कोरोना टेस्ट ची लॅब नाही, कोरोना ग्रस्त संसर्ग प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ची यंत्रणा नाही, कोरोना संसर्ग विरोधात लढण्यासाठी आरोग्य विभागात सुसज्ज यंत्रणा ,फवारणी यंत्रणा नाही विचारकरा इटली,अमेरिका,ब्रिटन देशाने कोरोना समोर शरणागती पत्करली आहे. तरी शासना ने कोरोना संसर्ग रूग्णांसाठी चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय सर्व साधन सामुग्री ने सुसज्ज करावे . अशी विनंती शेवटी प्रा.गौतम निकम यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.