घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. विनयभंग करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात २९ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. घर काम करून उदरनिर्वाह करते. दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विवाहिता घरात एकटी असतांना संशयित आरोपी कमलेश बुधलदास चिमराणी रा. जळगाव हा बळजबरीने घरात घुसून महिलेशी अश्लिल हाभाव व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

संशयित आरोपीने यापूर्वी देखील पाठलाग करून फेसबूक व पेपरमध्ये तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली होती. याला कंटाळून विवाहितेने यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री नऊ वाजता धाव घेतली आणि तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कमलेश बुधलदास चिमराणी रा. जळगाव याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.