अल्पवयीन मुलास फुस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथून अल्पवयीन मुलास अमिष दाखवून अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील हिरापूर येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलास अमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. दरम्यान सदर मुलगा हा मामाकडे आलेला असताना हि घटना घडली आहे. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. मात्र अल्पवयीन मुलगा हा मिळून आले नाही.

त्यावर वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुलास अमिष दाखवून पळविल्याचे वडिलांनी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पगारे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.