चार मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील शाहुनगर परिसरात मध्यरात्री घरातून चार मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल विनायक काटकर (वय ३३, रा. शाहुनगर ट्राफीक गार्डन) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते एका खासगी बँकेत नोकरीला आहे. सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता सर्वजण जेवण करून झोपले होते. त्यावेळी पावसाचे पाणी आल्याने त्याचा घराचा दरवाजा लागत नसल्याने त्यांनी दरवाजा लोटून झोपले.

मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील सदस्यांचे ५९ हजार रूपये किंमतीचे २ मोबाईल लंपास केले. त्यांच्याच घराजवळ राहणारे सतीष गजानन साळुखे (वय ३९) यांचे देखील दोन मोबाईल असे एकुण ५९ हजाराचे चार मोबाईल चोरीला गेल्याचे मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. घरातून एकुण चार मोबाईल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल विनायक यांनी बुधवार २३ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून मोबाईल चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सकाळी ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना घरफोडीतील संशयित आरोपी हे सुरत येथे जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ खवले, प्रफुल्ल धांडे, पो.ना. भास्कर ठाकरे, योगेश पाटील, पो.कॉ. रतन गिते, पोकॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे, पोकॉ. प्रणेश ठाकूर यांनी अवघ्यात एका तासात संशयित आरोपी शोयब उर्फ एक्का शरीफ भिस्ती (वय २०), सागर राजू उगले (वय २५) आणि जुबेर उर्फ डेविड जाविद भिस्ती (वय २२) तिघे रा. शाहू नगर यांना बुधवार २४ नोव्हेंबर रोजी ११ वाजता शाहू नगरातून अटक केली आहे. तिघांकडून चोरीचे चारही मोबाईल हस्तगत करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.