गोजोरा येथे घरफोडी; सहा लाखांचे दागिने लांबविले

0

भुसावळ ;- तालुक्यातील गोजोरा येथील एका बंद घराचे कडी कोंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख 13 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा दागिन्यांचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मालतीबाई अभिमान चौधरी वय 57 या गोजोरा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून 26 जुलै 2023 च्या सायंकाळी सात ते सात ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचे कडीकोंडा व कुलूप तोडून आठ प्रवेश करून कपाटातील सोन्याचा चपलाहार सोन्याची चैन, अंगठी गळ्यातील पोत, सोन्याचे डोंगल, पायातील पैंजण मंगल पोत नेकलेस ,सोन्याच्या पाट्या, सोन्याच्या बाह्या, चांदीचा आकडा, आणि दोन लाख रुपये एफडी असलेली पावती असा एकूण सहा लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सपोनी अमोल पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.