गिरणेला ५० वर्षापूर्वी आला होता महापूर !

0

14 सप्टेंबर 1969 ला आला होता महापूर ; संपूर्ण भडगाव शहर बुडाले होते

ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या आठवणींना उजाळा

भडगाव (सागर महाजन) :- गिरणा नदी ही जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली आहे. धरणाचे काम झाल्यानंतर 14 सप्टेंबर 1969 ला सतत जोरदार पाऊस पडत होता. हा पाऊस इतका भयानक होता की गिरणा धरण 100 % भरून त्यामधून विसर्ग व सर्व गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरूच होता. या वेळी भडगाव शहर हे संपूर्ण पाण्याने वेढले होते. नागरिकांनी स्तलातरण केले होते गावातील वाडे, घरे, दारे, पाण्याखाली होते. गिरणाने रौद्र रूप धारण केले. होते. त्या वेळी नागरिकांनी सतत पडणारा पाणी व महापुरामुळे दहशतीत वातावरण होते .

तेव्हा घोड बर्डी वसली
शहरातील यशवंत नगर, इंदिरा नगर ( घोड बर्डी) इथे त्याकाळी शेती आणि जंगल होते. 1969 मध्ये गावातीलच नागरिकांनी महापुरतून बचावासाठी स्तलातर केले. व तेथेच वस्ती तयार करून राहायला लागले . तेव्हापासून घोड बर्डी आतचे यशवंत नगर वसले.

त्याकाळी नागरिक खऱ्या पुरामुळे घाबरले तर आता व्हॉटसअप, फेसबुक, सोशल मीडिया वर अफवांचे फेक पोस्ट मूळे…

14 सप्टेंबर 1969 मध्ये जो महापूर आला होता तो खरंच भयावह होता. त्यामुळे कित्तेक नुकसान या परिसराला खावे लागले. परंतु आता मोबाईल मधील व्हॉटसअप, फेसबुक, सोशल मीडिया वर सर्व अफवांचे पेव फुटले आहे. कुणी फेक पोस्ट टाकली तीच फेक पोस्ट सर्व दूर पसवली जाते व नागरिकांना भयभीत केले जाते. कुठल्याही धरणाचे फोटो शेअर केले जातात व हे धरण आहे त्यातून आताच पाणी सोडण्यात आले असे जुने व्हिडिओ काहीच माहिती न घेता पसरवतात . या मुळे प्रशासनाने व भडगाव पोलिस स्टेशन ने अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पस्वनाऱ्य वर कार्यवाही करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.