लासुर जि.प. शाळेत मोफत कापडी पिशिवी वाटप

0

लोहारा ता.पाचोरा (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्र, यांच्यातर्फे चोपडा तालुक्यातील लासुर जिल्हा परिषद कन्या शाळा आणि मुलांची शाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

यामुळे पर्यावरणाचा संतुलन राखण्यास मदत झाली या उपक्रमास येथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी खूप छान प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी उल्हास पाटीलमाविम जळगांव , प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र चोपडा व्यवस्थापक सलीम तडवी आणि लासुर येथील सहयोगिनी वैशाली पाटील,प्रेरक मनीषा सैंदाणे ,सुनिता माळी सामाजिक कार्यकर्ते नंदू माळी व गावांतील नागरिक यांचे याकामी सहकार्य लाभले या उपक्रमाने पर्यावरणाची हानी करणाऱ्या वस्तूंचे वापर करू नये असा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजावण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.