गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह तरूण एलसीबीच्या जाळ्यात

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर शहरातील खादगाव रस्त्यावरून एलसीबीच्या पथकाने गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह एका तरूणाला अटक केली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीने जामनेर येथे मोठी कारवाई केली आहे. एलसीबीचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जामनेर शहरात खादगाव रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनुसार किरणकुमार बकाले यांनी पथकाची निर्मिती केली. या पथकाने बाळू शामा पवार (वय २१, रा. डोहरी तांडा ता, जामनेर) या संशयित तरूणाची चौकशी करून त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेस एक गावठी कट्टा आणि एक राऊंड काडतुसे असणारे मॅगझीन आढळून आले. याप्रकरणी त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून पंचनामा करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही साठी जामनेर पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई एलसीबीचे प्रमुख पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार महेश महाजन, लक्ष्मण पाटील; पो. ना. किशोर राठोड, रणजित जाधव, कृष्णा देशमुख, पो. कॉ. विनोद पाटिल, ईश्वर पाटील आणि भारत पाटील यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.