गाडगेबाबा जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेचा जागर

0

जळगाव-  स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांच्या १४४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला निस्वार्थ सेवा प्रतिष्ठाण,नवजीवन प्लस व हिंदुस्थान युनीलिव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुण भागातील आनंदघर येथे स्वच्छतेचा जागर कार्यक्रम घेण्यात आला.

वर्धेष्णु सोशल रिसर्च अँड डेवलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर येथिल शाळाबाह्य व कचरावेचक मुले यांना आपले घर व परिसर स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छतेसाठी लाईफबॉय साबण, पेपसोडन्ट टूथ पेस्ट,टूथ ब्रश व बिस्कीटचा पुडा असे किट वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे,नगरसेवक गणेश सोनवणे,छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे,हिंदुस्तान युनिलिव्हरचे जयंत वाघ,भरत जाधव, चंदू राजपूत,गाडगेबाबा युवा विचारमंचचे अध्यक्ष गणेश सपके, जिल्हा लॉड्री असोशियशनचे अध्यक्ष मनोज निंबाळकर,सचिन बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मुलांना स्वच्छतेची शपथ युवा प्रेरणा फौंडेशनचे अध्यक्ष विक्की सोनार यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक निस्वार्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीष शिरसाळे यांनी केले. नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया,हिंदुस्थान लिव्हरचे सचिन खोट,नितीन पाटील, यांचे सहकार्य लाभले. आनंदघरच्या प्रणाली सिसोदिया, अद्वैत दंडवते,भावना करंदीकर, रविना सोनवणे यांनी परिश्रम घेतले.आभार सचिव निलेश निंबाळकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.