गुणवंतराव पाटील यांना ” भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार प्रदान

0
 पारोळा– प्रतिनिधी
आज जिल्हा नियोजन सभागृह जळगांवच्या सुंदर सभागृहात झालेल्या शानदार पुरस्कार वितरण समारंभात धाबे जि प प्राथ शाळा ता पारोळाचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन जळगावचा ” भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार २०१९-२० हा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील स्तुत्य व उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पाटील ग स चेअरमन जळगाव तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग स माजी संचालक व्ही एम पाटील पारोळा, अनिलभैय्या कासट उदयोगपती पाळधी, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, प्रविण पाटील, शुभांगी बिऱ्हाडे अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ, अ फ भालेराव ज्येष्ठ साहित्यिक, भारती काळे संचालिका हेल्थ प्लस, राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे पारोळा, शिक्षक समितीचे देविदास सोनवणे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उप शिक्षणाधिकारी जि प डॉ डी एम देवांग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .
यावेळी गुणवंतराव पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, मातोश्री व कुटुंबातील सदस्य व मित्र परिवार उपस्थित होता .

Leave A Reply

Your email address will not be published.