खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; जयंत पाटलांची घोषणा

0

मुंबई :  गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चेवर अखेर पूर्णविराम लागला आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

एकनाथ खडसे हे  कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.  येत्या 22 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा  दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला आहे.

खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काय मिळणार?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.