एकनाथराव खडसेंचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा ; कन्येसह राष्ट्रवादीत जाणार

0

जळगाव : जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं वृत्त आहे. एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे.

खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता  एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त देखील आहे. मात्र खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.