भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली ; राजीनाम्यानंतर खडसेंनी स्पष्ट केली भूमिका

0

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, खडसे यांनी आपल्या राजीनाम्याबाबतची भूमिका आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” पक्षाने सुद्धा मला बरेच काही दिले. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. आपण नेतृत्वावर कधीही टीका केली नाही.असं एकनाथ खडसे म्हणाले.

भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं.  देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं.  भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले.माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.