खडसे नाराज असल्याचे भाजपनेही केले मान्य

0

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी जाहीर व्यासपीठावरूनही बोलून दाखवली आहे. मात्र, खडसे नाराज असल्याचे भाजपने प्रथमच मान्य केले आहे.

राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या काही नेत्यांमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे संकेत मिळत आहेत. खडसे यांनी तर वारंवार जाहीरपणे नाराजी उघड केली आहे. त्यातून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे नाराज असल्याची कबुली दिली. अर्थात, भाजपमध्येच राहण्यासाठी खडसे यांची मनधरणी करण्यात येईल.त्यांच्या डीएनएमध्ये भाजप आहे. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार बुधवारी येथे विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या वक्तव्यामुळे खडसे भाजपवर नाराज असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.