भडगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत ५ उमेदवार रिंगणात

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ३ ड जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकी करीत एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि. १८ रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी 1.माळी मिनाबाई रविंद्र, 2. पाटील लीला हरीष या दोन उमेदवारांनी राजेन्द्र कचरे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे माघार अर्ज सादर केला. त्यामुळे प्रभाग ३ ड च्या जागेसाठी बंगाले जिजाबाई उत्तम (अपक्ष), पाटील समीक्षा लखीचंद (शिवसेना), मलिक बुगदादबी कलंदरमलक (अपक्ष), महाजन लक्ष्मीबाई भिका (अपक्ष), खान रईसबी कुर्बान (राष्ट्रवादी) हे ५ उमेदवार रिंगणात असणार आहेत.
उमेदवारांना चिन्ह दि. १९ रोजी नेमून देण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.