बोदवड येथे चावडी मेळावा संपन्न

0

आयोजित मेळाव्यात तालुक्यातील महिला बचत गटांना कर्ज वाटप
बोदवड (प्रतिनिधी) – येथे भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती बोदवड अंतर्गत दि.१८ रोजी चावडी मेळावा पार पडला.
या आयोजित चावडी मेळाव्यातून तालुक्यातील महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले,त्यामधे स्टेट बँक ऑफ इंडिया बोदवड शाखा यांनी २२ महिला बचत गटांना ३८ लाख रुपये व स्टेट बँक ऑफ इंडिया एणगाव शाखे तर्फे ५ महिला बचत गटांना ८ लाख रूपये वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे डि.जी.एम.औरंगाबाद शेशूबाबू सर,बोदवड तहसिलदार श्री.रविंद्र जोगी,रीजनल मॅनेजर सुशील कुमार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.रामदास पाटील,मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया बोदवड अरुण कुमार,सुनील सर,तिवारी सर,श्री.गुजराती सर,श्री.भावसार सर तसेच तालुका अभियान व्यवस्थापक संदीप मेश्राम,व तालुक्यतील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी व तालुक्यातील येवती,धोंडखेडा,कु-हा हारदो, लोणवाडी, धानोरी, जुनोने, निमखेड, घाणखेड, एणगाव,वडजी,येथील महिला बचत गटाच्या ४०० महिला सदस्या उपस्थित होत्या. मेळावा यशस्वीतेसाठी महिला बचत गटाच्या सी.आर.पी.यांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.