कोरोना लसीबाबतची माहिती पोहोचवण्यासाठी भारत सरकारने आणले ‘कोव्हिन’अ‍ॅप

0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : कोरोनावर मात करण्यासाठी जगात लस निर्मितीचे अतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकने कोव्हिड – 19 वर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. दरम्यान, कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास अॅप तयार केलं आहे.

कोव्हिन असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप तुम्हाला कोरोना लसीचा साठा, त्याचे वितरण, स्टोरेज याबाबतची माहिती देईल. ही लस जेव्हा दिली जाईल, तेव्हा त्याचे वेळापत्रकही कोव्हिन अ‍ॅपवर उपलब्ध होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला देशभरातील 28 हजार स्टोरेज सेंटरमधील लसींच्या साठ्याविषयची माहिती मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.