मनसेच्या साकळी शाखाप्रमुखांसह कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

0

यावल – यावल येथे शिवसेना पक्षा तर्फ. प्रवेश सोहळा पार पडला. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकळी शाखाप्रमुख संताेष सुरेश महाजन तसेच कार्यकर्ते प्रविण पुंडलिक माळी या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
शिवसेनेची यावल तालुक्याची बैठक २० रोजी यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघा कार्यकर्त्यांना शिवसेनेचा ‘भगवा स्कार्प ‘ शिवसेनेत प्रवेश देण्यात आलेला आला व त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार(मुन्ना)पाटील,तालुकाप्रमुख रवि सोनवणे, गोपाळ चौधरी, यावलच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, सेनेचे साकळी- दहिगाव गटाचे गटप्रमूख महेंद्र चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.