कोयनेच्या जलाशयात  बुडून दोन मुलींचा मृत्यू 

0

सातारा– जिल्ह्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना वाळणे (ता महाबळेश्वर) गावात हीघडली.

१२ ते १३ वयोगटातील चार मुली रविवारी 5 दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर  जलाशयात पोहायला गेल्या होत्या. पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या. यावेळी मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला. यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी एकीचा जागीच मृत्यू झाला. तर तिघींना उपचारासाठी तापोळा येथे आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथे पाठवण्यात आले उपचार सुरू असताना एकीचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचवण्यात यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.