कोणता झेंडा घेऊ हाती , कार्यकत्यार्ंंची व्दिधा मनस्थिती

0

भाजपाचे उमेदवारांची अनिश्चिता ः दोन्ही जागा आमच्याच रॉ.कॉ.ची दादागीरी -कॉगे्रस जागेसाठी लाचार

जळगांव. दि.9-
सतराव्या लोकसभेसाठी आचार संहिता येत्या दोन तीन दिवसांत केव्हाही लागू होउन निवडणूकांच्या तारखा जाहिर होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची समिकरणे पाहता उमेदवार जाहिर झालेले नाहीत तसेच पदाधिकार्‍यांमधे जेष्ठ-श्रेष्ठ कनिष्ठ असे अंतर्गत वाद तसेच कुरबुरी पहाता कोणता झेंडा घेउ हाती अशी व्दिधा अवस्था तळागाळातील प्रचारक कार्यकत्यार्ंमधे आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेनेने आघाडी घेउन जळगांव लोकसभा स्वबळावर लढणार म्हणून उमेदवार जाहिर करून टाकला होता. परंतु ऐनवेळी सेना भाजपात युती झाल्याने आपली तलवार म्यान केली तर भाजपाने उमेदवार अजुन जाहिर केले नाहीत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने एक उमेदवार जाहिर करून दुसरे पान झाकुन ठेवल आहे. तर
जिल्ह्यात लोकसभेच्या जागा आहेत. जळगांव जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर पुर्व आणि पश्चिम खान्देश असे जळगांव धुळे व आताचा नंदूरबार असे भाग ओळखले जात होते. फैजपूर येथे काँगेसचे पहिल अधिवेशन भरले होते तेव्हापासून ते गेल्या दोन पंचवार्षिक पुर्वी काँगेसचा बालेकिल्ला असलेला जिल्हा म्हटल्यास वावगे होणार नाही. धुळे जिल्हा अजुनही काँगे्रसच्या वर्चस्वाखाली आहे. परंतु गेल्या दोन पंचवार्षिक पासून भाजपाच्या तडाखेबाज सडेतोड नेतृत्व असलेल्या आ. खडसेंच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात मुसंडी मारून दोन्ही जागा काँग्रेसकडून काबीज केल्या त्यानंतर काँग्रेसची पडझड सुरू आहे ती अजुनही सावरली जात नाही. जिल्हध्यक्षांची खांंदेपालट करून पाहिली. प्रदेश पातळीवरून दिग्गज नेतेमंडळींनी मतभेद मनभेद दूर करून नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या काँग्रेसला पहिली उमेद अजुनही मिळवता आली नाही. तर राष्ट्रवादी काँगे्रसने मागुन येवून आमदारांच्या व तळागाळातील कार्यकत्यार्ंच्या माध्यमातुन पुर्ण गडच काबीज केला. 16 व्या लोकसभेसाठी तयारी नसतांना आ. डॉ. सतीष पाटलांना बळेबळेच घोडयावर बसविले आणि भाजपााने नेमकी त्याच वेळी बाजी मारली. राष्ट्रवादीकडून आव्हान मिळाल्याने आ. खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेलेल्या हरीभाउ जावळे यांना समजुत काढून रक्षा खडसे यांना खासदारकीसाठी उभे केले आणि निवडून देखिल आणले. त्यानंतर तीन चार महिन्यांनी विधानसभेच्या निवंडणूकात देखिल युती न करता स्वबळावर निवडणूक लढवून भाजपाचे बहुसंख्य आमदार निवडून आले. आणि दिड दोन वर्षाच्या कार्यकाळ पुर्ण होत नाही तोच महसुल, पालकमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर नाथाभाउंचे कार्यकत्यार्ंमधे काहीसे नाराजीचे वातावरण आहे ते अजुनही आहे. हिच संधी पाहुन सेना व राष्ट्रवादीने आपले बलस्थान कार्यकत्यार्ंच्या माध्यमातुन पकके करण्याचे ठरविले आणि त्यानुसार गेल्या दोन वर्षापासून लेाकसभा जिकांयचीच या उद्देशाने सर्वसामान्याच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने, रास्ता रोको करून आपले अस्तित्व दाखवून दिले. आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या सप्ताहात जळगाव लोकसभेसाठी अनुंभवी असलेल्या माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांना उमेदवार म्हणून जाहिर करून टाकले. आणि रावेरचे पान मात्र झाकुन ठेवले आहे. रावेर साठी माजी आमदार संतोष चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांचे नाव चर्चेत असले तरी अजुन काहीही निश्चित केलेले नाही. तर कॉग्रेसने आघाडी केल्यानंतर त्यांना एक जागा मिळेल असे गृहित धरून आतापर्यत रा. काँ. च्या मागेमागे फिरत आहे. याउलट भाजपा मधे स्थिती आहे. भाजपाचे दोनही विनिंग सिट असून सुद्धा उमेदवार निश्चित केलेला नाही . कदाचित दोनही मतदार संघात कोरी पाटी असलेले नविनच उमेदवार देण्याच्या मनस्थितीत चाचपणी सुरू आहे. त्यातुन एकाद वेळेस रावेर मतदार संघात लोकसभेसाठी उमेदवारी दुसर्‍याला दिल्याने विद्यमान खासदार खडसे यांचा पक्ष बदल होउ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने खा. रक्षा खडसे यांना ऐनवेळी रावेरसाठी घोषित केले जाईल अशी शक्यता देखिल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.