चहार्डी येथील दोन महिला झाल्या पीएसआय

0

दोघांची घरची परिस्थिती नाजूक असताना मिळवले यश

चोपडा.दि.9- (रमेश जे. पाटील)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील माहेरवाशीन व ता धुळे येथील रहिवासी असलेल्या राजश्री पाटील व चहार्डी येथीलच माधुरी रवींद्र कंखरे या दोन्ही महिला आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी पीएसआय झाल्या असून एकाच वेळी एकाच दिवशी तालुक्यातील चहार्डी येथे फार मोठं यश मिळाले असून गावात एकच आनंदाचे वातावरण झाले आहे.
राजश्री पाटील यांचे लग्न होऊन बोरिस ता येथे वास्तव्य असले तरी दोन महिन्यांपासून नंदुरबार पालिकेत कर निरीक्षक यापदावर काम करत असताना त्यांना हे मोठे यश मिळाले असून पती संदीप शत्रुघ्न पाटील हे मोहाडी ता धुळे येथे माध्यमिक शिक्षक असून जळगाव येथील दीपस्तंभ चे यजुर्वेद महाजन यांनी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.प्राथमिक शिक्षण हे चहार्डीत आणि अकरावी व हे महाविद्यालयीन शिक्षण व डीएड चे शिक्षण चोपडा कॉलेज आणि बीएड चे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केल्यावर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर चे स्वप्न पाहिले असताना त्यात यश न मिळाल्याने त्यांनी पीएसआय ची परीक्षा देऊन आज राजश्रीने मोठे यश मिळवले आहे.
राजश्री पाटील हिने बोलताना सांगितले की,मला या यशात माझ्या आईचे स्वप्न होते.आईने सागितले होते की बेटा तू मोठं शिक्षण घेऊन अधिकारी झाले पाहिजे.आई चहार्डी येथे अंगणवाडी सेविका असून वडील शेतमजुरी करतात.माझे लग्न झाल्यानंतर पती शिक्षक असल्याने त्यांनी उत्तम असे मार्गदर्शन करून मला खूप प्रोत्साहन दिल्याने हे यश मिळू शकले आहे.मला भविष्यात महिलांसाठी काम करायचे आहे.
हुंडयासाठी लग्न मोडले जात तरी भावाने नोकरी करून मला आर्थिक सहकार्य केले आणि अखेर त्याच्यामुळेच मी पीएसआय होऊ शकली आहे असे माधुरीने सांगून आनंद व्यक्त केला आहे.
अंत्यत गरिबीच्या परिस्थितीवर मात करून हुंडयासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने लग्न मोडले जात होते,मात्र भाऊ याने लग्न करू नका तिला शिकू द्या,लग्न नंतर पाहू असे सांगून लहान किशोर कंखरे याने मुबई मध्ये जॉब करून मला आर्थिक मदत दिली म्हणून मी महागडे पुस्तके घेऊन अभ्यास करून आज अखेर पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली अशी माहिती स्वतः माधुरीने बोलताना दिली आहे.
** माधुरी हिने आपले प्राथमिक शिक्षण गावी चहार्डी येथे पूर्ण केले असून घराची आर्थिक परीस्थिती बेताची रवींद्र कंखरे हे दुसर्‍याच्या घरी ट्रॅकर चालवून घराचा संसाराचा गाडा चालवीत असताना माधुरी ने जळगाव ला राहून 2017 पासून लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी जळगाव ला क्लास लावण्यासाठी पैसे नसताना जळगावला थांबून घरीच अभ्यास करून गेल्यावर्षी परीक्षा दिली होती आणि आज निकाल लागला असून अखेर पीएसआय होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचे मोठं समाधान असलं तरी यात मी फक्त भावामुळेच पीएसआय होऊ शकली आहे माधुरी हिने सागितले.
** गरीबाच्या घरात जन्म घेऊन मुलींना शिकता येत नाही हे वास्तव चित्र असले तरी आई वडील व नातेवाईक मुलींचे लग्नाची घाई करतात .आणि लग्नानंतर पाहिजे यश मिळत नाही.म्हणू न लग्नाचा विचार बाजूला ठेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून आज अधिकारी झाल्याचे मोठं आनंद होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.