किनगाव येथील राहुल पाटील यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती

0

यावल (प्रतिनीधी ) तालुक्यातिल किनगाव येथील अरूण मुरलीधर पाटील (अरूण टेलर) व सौ.रंजना अरूण पाटील यांचा मुलगा राहुल अरूण पाटील यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली .
राहुल पाटील यांचे इ.१ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमीक शिक्षण जि.प.मराठी शाळा किनगाव येथे इ.५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय किनगाव येथे इ.८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण ए.टी.झांबरे विद्यालय जळगाव येथे तर इ.११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण एस.पी.आय. औरंगाबाद येथे सन २०१३-२०१५ मध्ये झाले तर १२ वी च्या गुणवत्तेवर गणीत विषय घेऊन पदवीचे शिक्षण नुतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे झाले तर येथे ते एन.सी.सी.कँडेट होते त्यांना गुजरात एन.सी.सी.कँम्पमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले तसेच पदवीचे शिक्षण घेत असतांना एन.सी.सी.ची सी.सर्ट परीक्षाही ते प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले . त्यानुसार त्यांना एस.एस.बी.साठी इलाहाबाद सेंटर देण्यात आले तर १० जुन २०१९ रोजी इलाहाबाद येथे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आधीकारी प्रशिक्षणासाठी निवड झाली व २० आँक्टोबर २०१९ रोजी आँफीसर्स ट्रेनिंग अँकेडमी चेनैई येथे प्रशिक्षणास सुरूवात झाली. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करून २१ नोव्हेंबर २०२० रोजी दिक्षांत समारोह पुर्ण करून त्यांना लेफ्टनंट या पदाची पदक मेजर अर्जीत शहा यांनी सपत्निक समारंभात प्रदान केली. राहुल पाटील यांची नियुक्ती इंन्फट्री १/३ गोरखा रेजिमेंट साठी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे आधीकारी होण्याचे त्यांचे स्वप्न ही होते तर बाँक्सींग व क्रिकेट यांची त्यांना आवड होती . सामांन्य कुटुंबातील राहुल पाटील यांचे आजोबा कै.माजी सैनिक मुरलीधर नंथ्थु पाटील यांनी आर्मी अटलरी सैन्यात सेवा बजावली होती. व १९६५ व १९७१ या दोन्ही युद्धातही त्यांनी देशासाठी सेवा दिली होती. आज राहुल पाटील यांनी लेफ्टनंट पदाची सेवा स्वीकारत आपल्या परीवाराचा देशसेवेसाठीचा वारसा कायम ठेवला आहे . राहुल पाटील यांच्या या यशासाठी त्यांच्या परीवारासह नातेवाईक व किनगावकरांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.