कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पोलिसांत गुन्हा दाखल

0

भुसावळ : व्यवसायासाठी व कार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घेण्यासाठी माहेरून ३ लाख रूपये आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या मुक्ताईनगर येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरूद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील माहेर असलेल्या स्नेहा रोशन इंगळे (वय २५) यांचा विवाह रोशन इंगळे यांच्याशी झाला होता. स्नेहा इंगळे यांनी माहेरून ३ लाख रूपये आणावेत, यासाठी त्यांचे पती, सासरे महादेव इंगळे, जानुजी इंगळे, सासू विमल इंगळे, ननंद रिना महादेव इंगळे (सर्व रा. अष्टविनायक कॉलनी, मुक्ताईनगर) यांनी वारंवार स्नेहा यांचा छळ केला. तसेच सोने काढून घेत शारीरिक व मानसिक छळ, शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरूध्द बाजारपेठ

पत्नीवर चाकू हल्ला, पतीविरुद्ध गुन्हा भुसावळ : पतीने पत्नीवर चाकूचे वार करून तिला जखमी केल्याची घटना गोजोरे (ता. भुसावळ) येथे रविवारी संध्याकाळी घडली… याप्रकरणी पतीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजय प्रकाश सपकाळे (वय ३२, रा. असोदा, धांडेनगर, तरसोद रोड, जळगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याने दारूच्या नशेत पत्नी सुरेखा (वय ३०) हिच्यावर धारदार चाकूने सुरेखावर वार केला. यात ती जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. छाया अमृत सोनवणे (वय ६०, रा. गोजोरा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहायक पो. नि. अमोल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.