कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांची मेहनत यावरच पक्षाचे यश अवलंबून -ना.डॉ सुभाष भामरे

0

भुसावळ | प्रतिनिधी

कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांची मेहनत  यावरच पक्षाचे  यश अवलंबून असते असे सांगत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला जे यश मिळाले ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ प्रमुख यांनी घेतलेल्या  प्रचंड मेहनतीचे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपल्या भुसावळ विधानसभा  मतदार संघात प्रचंड मेहनतीने पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिकयाने  विजयी करावे व विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन करून आवाहन केंद्रीय  माजी संरक्षण मंत्री ना डॉ सुभाष भामरे  यांनी केले .

यावेळी व्यासपीठावर राज्याचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे खासदार रक्षाताई खडसे राज्याचे उपाध्यक्ष अशोक कांडेलकर , आमदार  संजय सावकारे ,नगराध्यक्ष रमण भोळे, पस सभापती प्रीती पाटिल , उप सभापती वंदना उन्हाळे,   तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, सौ अलका शेळके ,  तालुका महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष शैलजा पाटिल,  शहर अध्यक्ष पुरषोत्तम नारखेडे ,  जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खेवलकर खडसे, महिला  शहर प्रमुख मीना लोणारी , सौ रजनी सावकारे , पिंटू ठाकुर , मनोज बियाणी, युवराज लोणारी ,भुसावळ विधानसभा क्षेत्रातील भाजपा  पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी डॉ भामरे यांनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट् भाजपचे सरकार आहे हे सरकार सर्व स्तरावर यशस्वी ठरल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाला बहुमत मिळणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने जास्तीत जास्त मतदान आपल्या बूथ वर  करून घ्यावे जेणे करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले . मेरा बूथ सबसे मजबूत असे मार्गदर्शन आज भुसावळ येथे  विधानसभा  निवडणूकी करिता आयोजित कार्यकर्त्याच्या  बूथ समेलनात संबोधित  केले .

दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येवून कार्यक्रमास सुरवात झाली तसेच  आमदार संजय सावकारे  यांच्या पाच वर्षाच्या विकास कार्याचा  वृत्तांत असलेल्या  “दृष्टि क्षेप ” पुस्तकाचे प्रकाशन  करण्यात आले

खा रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असे विचार व्यक्त करून प्रत्येक बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बुथ नुसार  आपल्याला जी मते मिळाली त्यापेक्षा जास्त मिळून दाखवावे व यासाठी मतदार यांचा अभ्यास करून प्रत्येक मतदाराला मतदान पर्यंत पोहोचवावे तसेच  काँग्रेसने सत्ता उपभोगून सर्व स्तरातील जनतेला उपेक्षित ठेवले याउलट अवघ्या पाच वर्षात महाराष्ट्रातील भाजप सरकारने सर्व स्तरावर चांगली कामगिरी करून विकासाचा डोंगर उभा केला आहे भुसावळ मतदारसंघातील सावकारे  विकासाची कामे केली आहे याकरीता पुन्हा आमदार संजय सावकारे यांना जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी बूथ प्रमुखानी जोमाने कार्यास लागा महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त लक्ष घालावे असे आवाहन केले .दरम्यान मान्यवारांचे आगमना आधी नगराध्यक्ष रमण भोळे  यांनी पालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला .तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील पदाधिकारी ते बूथ प्रमुख ते कार्यकर्ते  तसेच शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांचेसह  सर्व नगरसेवक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .दरम्यान ग्रामीण भागातील राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते यांनी भाजपा मध्ये जाहिर प्रवेश घेतला यात  डॉ दिलीप बरकले ,रविंद्र पाटिल, निवृत्ती पाटिल , विलास राजपूत, मंगेश डोंगसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.