भुसावळात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

0

भुसावळ |  प्रतिनिधी 

शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.नगर परिषदेतर्फे रस्ते दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने आ.संजय सावकारे यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.विशेष म्हणजे विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाचे रमण भोळे यांना निवडून आणण्यात आ. सावकारे यांची भूमिका मोलाची होती. शहरातील विकास कामे नगरपरिषदेमार्फत लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मा. मंत्री आ.सावकारे यांनी भुसावळकरांना दिले होते.अ वर्ग असलेल्या या नगरपरिषदेकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असताना नियोजनशून्य कारभार व निर्णय क्षमता नसल्याने सर्व विकासकामे ठप्प असल्याने रोष व्यक्त केला जात होता. नाईलाजास्तव आ.सावकारे यांनी रस्ते दुरुस्तीची जबाबदारी घेतली असून आज दि.१७ सप्टेंबर रोजी रस्त्यांच्या डागडूजीसाठी स्‍वत उभे राहून सुरुवात केली.याप्रसंगी नगरसेवक परिक्षित बर्‍हाटे,किशोर पाटील,भाजपाचे शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.