तांबोळे येथे गळफास घेऊन आत्महत्या

0

चाळीसगाव | प्रतिनिधी 

तालुक्यातील तांबोळे येथे 38 वर्षीय इसमाने छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .

या घटनेची माहिती अशी की ,तांबोळे तालुका चाळीसगाव येथील रहिवाशी किशोर दगा जाधव (वय 38 )हा काल रात्री जेवण करून घराच्या मागील खोलीत झोपला असता रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जाधव यांचा कसलाच आवाज ऐकू न आल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी मागील खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता किशोर जाधव स्वतःला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासले असता ते मृत झाल्याचे सांगितले, किशोर जाधव यांनी गळफास घेतल्याचे कारण समजू शकले नाही याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरी वरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास हेका किशोर सोनवणे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.