खडकदेवळा – हिवरा मध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठा

0

प्रकल्पाच्या भितीवरुन पाणी ओसंडून वाहत आहे

 पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा – हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.या हिवरा माध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठ झाला असुन पाणी ओसंडून वाहत आहे. हिवरा माध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठ झाल्याने परिसरातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. परिसरातील पाणी पुरवठा करणारे अनेक  ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा हा याच प्रकल्पाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे  हिवरा माध्यम प्रकल्प 100 टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच हिवरा परिसरातील शेतकरी मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्प बनला धोकादायक

खडकदेवळा येथील प्रसिध्द असलेल्या  हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंती च्या पाईप ची चोरी झाली आहे. त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणार्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो त्यामुळे या ठिकाणी संरक्षणभिंती च्या पाईप ची चोरी झाल्याने याठिकाणी मोठी जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीत हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होवुन प्रकल्प 100 टक्के जलसाठ झाला असुन पाणी ओसंडून वाहत आहे. हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मातीच्या भरावाजवळील भिंतीच्या जवळपास तीस ते चाळीस फुटाचे मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत ते त्वरीत बुडवण्याची मागणी होत आहे. सध्या पाऊसाचे दिवस आहेत. त्यामुळे प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.