कारवाईसाठी जि.प. पाहणार मुहूर्ताचीच वाट! भाग -7

0

जिल्हाभरातील अहवाल प्राप्त : गोपनीयतेच्या नावाखाली चालढकल

जळगाव, दि. 15 –
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा झालेला पुरवठा जिल्हा परिषदेच्या अंगलगट येत असून कागदीघोडे नाचविण्यास सुरुवात झाली आहे. रँडम पद्धतीने करण्यात आलेल्या चौकशीचे अहवाल आज दि. 15 रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून आता कारवाईसाठी मुहूर्ताची वाट बघितली जात आहे.

सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष
र्ी बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण उजेडात आणणार्‍या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांच्या मागणीकडे प्रशासन हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत आहेत. श्रीमती राजपूत यांनी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मागील सभेत केली असून त्या प्रकरणावर आक्रमक झाल्या होत्या मात्र त्यांच्या मागणीकडे सत्ताधारी कानाडोळा करीत आहेत.

अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा होत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांना घरपोच आहार योजनेतून धुळ्यातील मक्तदार आहाराचा पुरवठा करीत असून शेवयांना लागलेल्या बुरशीने या प्रकरणातील गौडबंगाल समोर आले आहे. बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा करणार्‍या मक्तेदाराला वाचविण्यासाठी भाजपाचे काही लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रयत्नांची शिकस्त करीत असून ते वेळ मारुन नेत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या रँडम चौकशीचे आदेश दिल्यानंतर या चौकश्यांचा अहवाला प्रवास देखील लांबला होता. तीन दिवसांपूर्वी अपेक्षित असलेला अहवाल मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी प्राप्त झाला असून या अहवालाचा अभ्यास करुन कारवाई करण्याची दिशा ठरविली जाणार असल्याने कारवाईसाठी जिल्हा परिषदेला मुहूर्ताचीच वाट पाहवी लागणार आहे. जिल्ह्यातील 15 अंगणवाड्यांचे अहवाल प्राप्त झाले असून कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.