कर्जाच्या नावाखाली साडेआठ लाखात ऑनलाईन फसवणूक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे.  लोन प्रकरण मंजूर करून कर्ज काढून देण्याच्या नावाखाली तरूणाची ८ लाख ३४ हजाराचा ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन लक्ष्मण सोनवणे (वय ३७, रा. पळासखेडा ता. जामनेर) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २७ सप्टेंबर रोजी त्यांना बजाज फायनान्स प्रतिनिधी नावाने बनावट कॉल आला. त्यांनी बजाज फायनान्स कडून ५ लाख रूपयांचे पर्सनल लोन मंजूरी करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ चार्जेस लावण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ८१७ रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वाकारले.

त्यानंतर समोरील व्यक्तीने बजाज फायनान्सचे  लोन मंजूरीचे बनावट लेटर पाठवून फसवणूक केल्याचे २७ ऑक्टोबर रोजी समोर आले. याप्रकरणी गजानन सोनवणे यांनी बुधवार ८ डिसेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली.

सोनवणे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.